Monday, 17 June 2019

आषाढी वारी 1

माझी माऊली निघेल
आता पंढरपुरा
गर्दी अलंकापुरा
भेटण्या विठुराया!
माझे तुकोबा बसतील
पालखीत साजिर्‍याशा
देहू गाव नाचू लागे
भेटण्या विठुराया!
वैष्णवांची तगमग
पेरणीची लगबग
पाऊसही लगोलग
हजेरी लावील!
चला जाऊ सारे आता
भक्तिरसात न्हाऊनी
चंद्रभागा इंद्रायणी
खुणविताती!


No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...