कुणीतरी येतं
घाव घालून जातंतरीही आपण जगत राहतो...
कुणीतरी येतं
कासावीस करतं
तरीही आपण जगत राहतो...
कुणीतरी येतं
आरोपांच्या फैरी झाडतं
तरीही आपण जगत राहतो....
कुणीतरी येतं
मखमली पायघड्या घालतं
तरीही आपण जगत राहतो...
कुणीतरी येतं
गंधित आठवण देतं
तरीही आपण जगत राहतो..
कुणीतरी येतं
पाठीवर थोपटतं
तरीही आपण जगत राहतो..
कुणीतरी येतं
तोंड दाबून बुक्के मारतं
तरीही आपण जगत राहतो
कुणीतरी येतं
सहवासाची कस्तुरी देतं
तरीही आपण जगत राहतो...
No comments:
Post a Comment