Tuesday, 15 September 2020

मनभावन हा श्रावण

 सरली पौर्णिमा आली कृष्ण प्रतिपदा

सोनेरी उन्हाने पाठविले त्याच्या दूता!
झाली पेरणी लावणी थकले बाळ्या सर्जा
येईल नाचत व्रत वैकल्यांचा राजा
दिसेल इंद्रचाप धरा हिरवाई लेईल
आनंदाचा झोका फांदीफांदाला बांधेल
शिव पार्वती पूजन औक्षण बाळासाठी
कृष्ण जन्म घेईल कंसाच्या नाशासाठी
येईल नागोबा राखी मनगटी सजेल
सईसाजणीच्या मनीचे गुज उलगडेल
चला आता हळूहळू करा रे तयारी
हळदी कुंकवाने भरेल सृष्टीची कोयरी
हिरवाकंच खण, नथ पाऊसमोत्याची
रानफुलांनी भरेल परडी पूजेची
अशी धरा समाधानी करेल स्वागत
अशा श्रावणाची वाट मी ही पाहते मनात!

No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...