तो काही येईना
काहिली साहवेनाझळा सोसवेना
विरहाच्या!
जीव थकला
डोळा शीण आला
दाटून येई गळा
कासावीस!
सखी म्हणे सईला
कुठे तो थांबला
वाट पाहून मंदावला
श्वास माझा!
सई देई दिलासा
नको जीव कासावीसा
येईल सुखाचा कवडसा
धीर धरी!
अचानक आला...
बरसून गेला..
सईला पोचविला
संदेश ओला...
आला ग शेवटी
पाणी आणवून दिठी
पाहून माझी कसोटी
ओलेता बिलगला!
आर्या
No comments:
Post a Comment